---------------
पोहरादेवी परिसरात कोरोना जनजागृती
पोहरादेवी : मानोरा तालुक्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोहरादेवी आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून परगावाहून परतलेल्या कामगारांची तपासणी करण्यासह ग्रामस्थात जनजागृती सुरू केली आहे. मंगळवारी ही मोहीम राबविण्यात आली.
---------
म्हसणी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती
इंझोरी : मानोरा तालुक्यातील म्हसणी येथे ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत सोमवारपासून स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. या उपक्रमात गावातील युवकांनी सहभाग घेतला असून, गावातील रस्त्यावर स्वच्छता अभियानही त्यांच्याकडून राबविले जात आहे.
-------------
नुकसानभरपाईची प्रतीक्षा
उंबर्डा बाजार : परिसरात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. मंगळवार २ फेब्रुवारीपर्यंतही शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. याची दखल घेण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
--------