०००
तोट्यांअभावी पाण्याचा अपव्यय
वाशिम : जुने शहरातील अनेक ठिकाणच्या नळांना आजही तोट्या लागलेल्या नाहीत. यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.
०००००
बसस्थानकातील डांबरीकरण प्रलंबित
वाशिम : स्थानिक बसस्थानकात एस.टी. उभ्या राहतात, त्याठिकाणी डांबरीकरण करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून त्यासाठी निधीसुद्धा मंजूर आहे; मात्र हे काम अद्याप पुर्णत्वाकडे आले नाही. काही ठिकाणी खड्डे असल्याने गैरसोय होत आहे.
०००
पोहरादेवी येथे पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम : पोहरादेवी परिसरातील अनेक गावांत मुख्य चौकातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पोहरादेवी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
००००
उंबर्डाबाजार येथे घरकुल अनुदान रखडले !
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान उंबर्डा बाजार परिसरातील ५० ते ६० लाभार्थ्यांना मिळाले नाही. लाभार्थ्यांनी लॉकडाऊनपूर्वी घरकुलाचे बांधकाम केले. त्यामुळे अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
०००००
कामरगाव परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी
वाशिम : कामरगाव-अमरावती मागार्चे काम झाल्याने भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. यामुळे गावाजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
००००
विहिरीची भरपाई देण्याची मागणी
वाशिम : अंचळ येथे शेतातील विहीर खचल्याचा पंचनामा दिल्यानंतरही दिव्यांग शेतकरी बाबूराव वानखेडे यांना भरपाई मिळाली नाही, ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी केली.
०००
अनसिंग येथे आणखी एक कोरोना रुग्ण
अनसिंग : वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार अनसिंग येथील आणखी एकाला कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
०००
ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्णब् अभियान प्रभावित
वाशिम : कोरोनामुळे ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियान प्रभावित झाले आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे यापूर्वी ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण अभियानाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली होती.
०००
तोंडगाव येथे आणखी चार बाधित
वाशिम : वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००
मेडशी येथे रोहयोची कामे सुरू करा !
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत मेडशी येथे कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी शेख गणीभाई मित्रमंडळाने सोमवारी प्रशासनाकडे केली आहे. रोजगाराअभावी मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
०००
किन्हीराजा येथे वाहतुकीस अडथळा
वाशिम : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या किन्हीराजा येथे महामार्गालत काही जणांनी अतिक्रमण केले आहे, तसेच गावातही मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
००
(फोटो आहे.)
बाजार समितीमध्ये आवक वाढली
वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर यासह अन्य शेतमालाची आवक वाढली आहे. गत दोन दिवस बाजार समित्या बंद असल्याने शेतकºयांना फटका बसला होता. बाजार समित्या पूर्ववत होताच शेतमालची आवक वाढली आहे. बाजारभावही बºयापैकी मिळत आहे.