वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजाफाटा येथे चेकपोस्ट कार्यान्वित केला असून, गत तीन दिवसांपासून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
रामनवमी निमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी यात्रा भरते. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून यंदा ही यात्रा रद्द केली होती. राज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना जवळपास चार दिवस पोहरादेवी येथे येण्यास बंदी आहे. म्हणून वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळपिर पोलीस स्टेशन अंतर्गत वनोजा फाटा येते चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले असून अकोला जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात आली. मंगरूळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस कर्मचारी नारायण शिंदे, गोपाल कव्हर, भगत, अंकुश म्हस्के, चोख बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाविषयक नियम न पाळणाºया वाहनचालकांवरदेखील या चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली.