वाशिम : स्थानिक नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दीक वादाचे पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. पोलीस विभागाने आतापर्यंत दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांविरूद्ध दखलपात्र स्वरुपाचे ७ तर अदखलपात्र स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल केले असून, त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी रविवारी स्पष्ट केले.२६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक वाद झाला असून, दोघांनीदेखील वाशिम शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधींमधील या शाब्दिक वादाचे पडसाद संपूर्ण जिल्हयात उमटुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक झाल्याने आतापर्यंत जिल्हयात दखलपात्र स्वरुपाचे ७ तर अदखलपात्र स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले, त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले.जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता प्रस्तापित राहावी म्हणुन पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार वाशिम, मंगरूळपीर व कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी जिल्हयातील ७४ इसमांविरुध्द स्थानबध्द करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय दंडाधिकाºयांकडे सादर केले होते. या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकाºयांनी एकतर्फी आदेश देऊन एकूण ७४ इसमांना स्वघरी स्थानबध्द राहण्याचे आदेश दिले तसेच या कालावधीत त्यांना इतरत्र फिरण्यास मनाई करण्यात आली. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरूद्ध यापूर्वीचे व सध्याचे दाखल गुन्ह्यावरून हद्दपार, मकोका आदी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावरुन प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे प्रस्ताव मागवून एकूण २१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविण्याचा प्रयत्न करणाºयांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पोलीस यंत्रणेला दिले.
खासदार-आमदारांमधील शाब्दीक वादाचे जिल्ह्यात पडसाद; कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 5:51 PM