लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: आरटीई अंतर्गत यंदा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात झाले आहेत लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविणेसाठी शासनाने मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणी आहे त्यामुळे केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २४ जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी होणार आहे. पश्चिम वºहाडात या प्रक्रियेची तयारी झालेली आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत यंदाच्या सत्रात अर्थात २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात झाले आहेत. तथापि, लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २४ जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या संदर्भात शाळांकडून प्रमाणपत्र पडताळणीबाबत एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधित पालकांना मूळ प्रमाणपत्रे व छांयाकित प्रतीच्या एका संचासह संबंधीत दिवशी शाळेवर उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व शाळांना करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यात यंदाच्या सत्रासाठी २२७८ विद्यार्थ्यांची, बुलडाणा जिल्ह्यात २६९९ विद्यार्थ्यांची, तर वाशिम जिल्ह्यात ९७६ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वी आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच करण्यात येत होती. यंदा लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या अडचणींमुळे पंचायत समितीस्तरावर कागदपत्रांची पडताळणी होणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने यंदाच्या सत्रासाठी शासनाने शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वच जिल्ह्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.-अंबादास मानकर,शिक्षणधिकारी (प्राथमिक)जि. प. वाशिम
आरटीई अंतर्गत शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:08 PM