जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या सत्रात मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन आवेदन पत्र भरले आहेत. या आवेदनपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असून, काही मुख्याध्यापकांनी यापूर्वीच आवेदनपत्रांची पडताळणी केली आहे. आता हे आवेदन पत्र शाळास्तरावर पुन्हा पडताळणीसाठी परत पाठविण्यात आले आहेत. मुख्याध्यापक, नोडल अधिकाऱ्यांना लॉगिनवरून हे आवेदन पत्र पाहून पुन्हा तपासणी करावी लागली. या प्रक्रियेसाठी वेळ कमी राहिल्याने माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारी रोजीच सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना या संदर्भात स्मरणपत्र पाठवून, निर्धारित मुदतीत अर्ज पडताळणीचे काम पूर्ण करून घेण्यासह, पडताळणीचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जिल्हास्तरावर अर्जांची पडताळणी केली जात आहे.
----------
१०० पेक्षा अधिक अर्जाच्या शाळांची स्वतंत्र माहिती
मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ज्या शाळांतून १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र किंवा अर्ज भरले आहेत. अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रांच्या प्रती, केवायसी फॉमर्ग गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिल्या. त्यानुसार, या शाळांची स्वतंत्र माहिती सादर करण्यात आली आहे.