समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा समूळ नष्ट व्हाव्यात व समाजात संत, समाजसुधारकांचे विवेकी विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अविरतपणे संघर्ष सुरू ठेवला.२०१४ मध्ये राज्यव्यापी जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी मोहीम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत राबवून जनजागृती केली. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला व पालकमंत्री यांनी तातडीने जिल्हा अधिकारी व सहायक आयुक्त समाजकल्याण वाशिम यांना पत्र देऊन समिती स्थापन करण्यासाठीचे आदेश दिले. यानुसार १० ऑगस्ट २०२१ ला बैठक घेऊन अखेर समिती तयार झाली. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी व सदस्य सचिव म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण, सदस्य म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), तर अशासकिय सदस्य म्हणून प्रा. उन्मेश घुगे, पुंजाजी सदाशिव खंदारे, कुसुम सोनुने, दतराव कोंडजी वानखेडे, विजय देवीदास भड, डॉ. रामकृष्ण कालापाड आदींची निवड झाली आहे. या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीला त्रास होत असेल तर त्यांनी शासकीय समितीच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन खंदारे यांनी केले आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत पीडितांनी माहिती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:29 AM