ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - उघड्यावर शौचालयाला जाण्याचे चित्र बदलावे, रोगराई कमी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्ह्यात मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेतंर्गत कलाकारांचे पथक ज्या घरामध्ये शौचालय नाही, त्यांच्या घरासमोर जाऊन गीताच्या माध्यमातून त्यांना शौचालय बांधण्याचे आवाहन करत आहे. यामुळे एक प्रकारे त्या कुटुंबाची फजितीदेखील होत आहे.
अभियानातील कलापथकाने कळंबा महाली गावातील अनेक घरांना भेट दिली. विशेष बाब म्हणजे, गावातील अनेक जणांचे सिमेंट काँक्रिटचे भलेमोठे घरे, घरासमोर गाडी असताना, त्यांच्याकडे साधे शौचालय नसल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, गावात पथक आल्याबरोबर अनेक पुरुषांनी गावातून पळ काढून कुटुंबातील महिलांना पुढे केले. यावेळी महिलांची फजिती झालीच, मात्र या महिलांनी पुढाकार घेत शौचालय बांधण्याचे कबूल केले. शौचालय बांधण्याची हमी मिळाल्यानंतरच स्वच्छ भारत मिशन अभियानाचे कलापथक तेथून निघून गेले.
https://www.dailymotion.com/video/x844h7l