ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 8 - मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील शेतक-यांनी सोमवारपासून (7 नोव्हेंबरपासून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आजदेखील सुरू आहे.
शेतक-यांच्या शेतजमिनीचे बनावट दस्ताऐवज बनवल्याप्रकरणी मूळ दस्ताऐवज दुरुस्त करुन देणे, तसंच संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यासंदर्भात शेतकरी मधूकर ठाकरेंसह अन्य शेतक-यांनी 24 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका-यांना निवेदनदेखील दिले होते. मात्र त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.
https://www.dailymotion.com/video/x844h9j