ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - मंगरूळपीर येथील बस आगारात चालकाविनाच बस धावल्याने प्रवासी आपल्या अंगावर बस येवू नये म्हणून सैरावैरा धावल्याची घटना २७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.
मंगरुळपीर आगारामध्ये एम.एच. ४० - ८७५८ क्रमांकाची बस आगारात उभी होती. अचानक ते चालकाविना धावू लागल्याने सर्व प्रवाशी आश्चर्यचकीत झाले. बंद बस धावत असतांना रस्त्याच्या मध्ये असलेल्या प्रवाशांना बसला पुढे जावू दिले. ७० ते ८० फुट अंतरापर्यंत बस चालत गेली व आगाराच्या आवार भिंतीला धडकल्याने थांबली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगाराच्या आवार भिंतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात आगारप्रमुख युधिष्ठर रामचवरे यांच्याशी संपर्क साधला असता बसचालकाने वाहन गेरमध्ये न टाकता न्युट्रलमध्ये ठेवली असावी त्यामुळे बस धावली असावी. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तब्बल एक तासाने आवारभिंतीमध्ये अडकलेली बस काढण्यात आगारातील कर्मचाऱ्यांना यश आले.
https://www.dailymotion.com/video/x844w9t