निनाद देशमुख, ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम), दि. ७ - रिसोड येथील एका तीन मजली अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहणाया विद्यार्थिनींच्या रुममध्ये ‘कोब्रा’ (नाग) निघाल्याने एकच धावपळ उडाली. त्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा तास लागल्याने सर्वांचेच श्वास रोखले गेले. महानंद कॉलनीमधील सिध्देश्वर कृपा अपार्टमेंटमध्ये आज सकाळी हा थरारक प्रकार घडला.
रिसोड येथील सिध्देश्वर कृपा अपार्टमेंटमध्ये शिक्षक संजय वाघ यांचा फ्लॅट तिस-या मजल्यावर आहे. सदर फ्लॅट देगाव येथे बिईएमएस शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींना भाडयाने देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे त्या अभ्यास करण्यासाठी बसत असतांना प्रियंका बाजड या विद्यार्थीनीस समोर काही वळवळताना आढळले. पहिले तिला ती गोमा वाटली, मात्र बारकाईने पाहिल्यानंतर साप असल्याचे कळल्याने प्रियंकासोबत राहणा-या साक्षी साखरे, श्रध्दा बिजवे या मैत्रिणींनी प्रियंकाने आरडाओरड केली. त्यांनी ही घटना दुस-या मजल्यावर राहणा-या प्रकाश मुंडे व एन.एम. देशमुख यांना सदर बाब कळली असता त्यांना. यांनी सर्पमित्र अनंत तायडे यांना पाचारण केले व रुममधील सापाचा शोध घेणे सुरु केले. तायडे यांना साप मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यास अर्धा तास लागला. मात्र हा साप साधासुधा नसून तो कोब्रा असल्याचे तायडेंनी सांगितले व त्यानंतर त्याला जंगलात सोडून दिले.
https://www.dailymotion.com/video/x844qn2