लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - अनियमित वीजपुरवठा आणि जादा भारनियमन यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या शिरपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांला घेराव घालत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. अनियमित वीजपुरवठा व भारनियमनामुळे मागील महिनाभरापासून शिरपूर, वाघी, खंडाळा, कोठा, ढोरखेडा, तिवळी यासह इतर गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामाच्या हरभरा, गहू पेरणी करण्यासाठी सिंचन आवश्यक आहे. मात्र, जादा भारनियमन आणि अनियमित वीजपुरवठा यामुळे सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यातच खंडोबा फिडरवर कार्यरत असलेले लाईनमन गोरे हे मुख्यालयी राहत नसल्याने अडचणींत भर पडल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शिरपूरचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना घेराव घातला. शेतकºयांच्या समस्या तात्काळ निकाली काढून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा २२ आॅक्टोबर रोजी शिरपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विश्वनाथ वाघ, संदीप शिंदे, आशिष खिल्लारे, नितीन वाघ, वैजनाथ शिंदे, अंकुश शिंदे, ज्ञानबा ईढोळे, नाथा पाटील, अंकुश शिंदे, ज्ञानबा इढोळे, अनिकेत ढंगारे, शिवाजी शिंदे, राजू सोळंके, साहेबराव शिंदे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.किनखेडा परिसरातील शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावररिसोड तालुक्यातील किनखेडा येथील वीजपुरवठा गत चार दिवसांपासून ठप्प असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि.प. सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्या नेतृत्वात किनखेडा येथील शेतकºयांनी १९ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यापूर्वी किनखेडा येथे केशवनगर वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा होत होता. आता देगाव येथील उपकेंद्रावरून वीजपुरवठा जोडण्यात आला. मात्र, या उपकेंद्रावरून योग्य दाबात वीजपुरवठा होत नसल्याने गत चार दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. यासंदर्भात दिलीप देशमुख, स्वप्नील सरनाईक यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. किनखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या निकाली काढली जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले.
वीजप्रश्नी शिरपूरच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 2:10 PM