मंगरूळपीर: शेलूबाजार येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या ढेपाळलेल्या कारभाराला वैतागलेल्या संतप्त नागरिकांनी तथा ग्राम पंचायत सदस्यांनी २९ मे रोजी कार्यालयाला ताला ठोकुन आपला रोष व्यक्त केला आहे. २८ रोजीच्या रात्री काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी महावितरणचे अभियंता, लाईनमन याच्याशी संपर्क साधून तो दुरूस्त करण्याची मागणी केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे गावातील वीजग्राहक संतापले होते. दरम्यान येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेलूबाजार पेठेतील व्यापारी त्रस्त झाले आहेत.शिवाय लघु व्यावसायिकांच्या व्यवसायावर अनियमीत विज पुरवठय़ाचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत.
ग्रामस्थांनी ठोकले महावितरण कार्यालयाला कुलूप
By admin | Published: May 30, 2014 1:06 AM