कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी सहसंचालक शंकरराव तोटावर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, सुभाष नानोटे, सरपंच साहेबराव भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात तोटावर म्हणाले की, सत्यमेव जयते पानी फाउंडेशन अंतर्गत गाव समृद्ध योजनेत जांब गावाचा समावेश असून, गावातील शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृषी विभाग विविध योजना राबवित आहे. याशिवाय यावर्षी या गावाने गाव समृद्ध स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यामध्ये गावकऱ्यांनी विविध उपक्रमांतून ५०० गुण मिळवण्यासाठी गावात जलसंधारण, जलव्यवस्थापन, मृदुसंधारण, गांडूळ खत, पाणीवापर याशिवाय गावात स्वयंम सहायता महिला बचतगट व आत्मा गट तयार करून उपजीविकेचे साधने निर्माण करणे आवश्यक आहे. यावेळी सुभाष नानोटे यांनी गाव स्पर्धाविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी अमोल हिसेकार, पांडुरंग आव्हाळे, जलसेवक गजानन भगत,शरद चुंबळे, गावतील सर्व वॉटर हिरो उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.