शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

गाव पूनर्वसनासाठी वाडी रामराववासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 6:26 PM

वाशिम   : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ नोव्हेंबर रोजी धडक देवून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

ठळक मुद्देअन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नदीचे खोलीकरण करण्याची मागणी

वाशिम   : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ नोव्हेंबर रोजी धडक देवून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. निवेदनावर शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

वाडी रामराववासियांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की,  १९८३ साली मोठया प्रमाणात आलेल्या महापुरामुळे गावात थैमान घातले होते. सर्व गाव टेकडीच्या ठिकाणी जावून रात्र काढली होतीत्र त्यावेळी खासदार गुलामनबी आझाद , तहसीलदार यांनी गावाची पाहणी करुन गाव पूनर्वसनाचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून नदीला पूर आल्यास धोका निर्माण होण्याची शकयता ग्रामस्थांमध्ये आहे.

 दरवर्षी गावाला लागून पूर जातो एखादयावेळी संपूर्ण गाव या पुरात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्या नदीला गावाच्यावर तीन धरण झाले आहेत. तसेच जऊळका येथे त्या नदीला मोठा बॅरेज आहे. त्या बॅरेजमध्ये पाणी फुल झाल्यावर जास्त पाऊस आला की, त्यातील पाणी एकाएकी सोडल्या जाते. अशावेळी गावाला धोका निर्माण होतो. म्हणून काटेपूर्णा नदीला अमानवाडी गावापासून ते धरमवाडी गावापर्यंत खोलीकरण करणे गरजेचे आहे.  असे झाल्यास गावाला धोका राहणार नाही. तसेच नदीकाठावरील हजारो एकर जमिन सिंचनाखाली येईल. करीता शासनाने याकडे लक्ष देवून गावकरकयांची मागणी पूर्ण करण्याचीमागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ३० डिसेंबर पर्यंत अधिकाºयांनी गावाची पाहणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.  निवेदनावर निळकंठ गुलाबराव घुगे,  मंगेश पांडे, संतोष मुसळे, विठल भुरकाडे,  निवास घुगे, देवानंद जाधव यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. या निवेदनाच्या प्रती  संबधितांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :collectorतहसीलदार