लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : रिसोड तालुक्यातील महागाव येथे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उघउ्यावर पडलेल्या लाखो कुटूंबाच्या मदतीसाठी गावात मदत फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी दुकानदार, व्यापारी तथा युवक वर्ग सहभागी झाले होवून पुरग्रस्तांसाठी मदत गोळा केली.कृष्णा खोºयात नद्यांना आलेल्या महापुरामुळे लाखो कुटूंब बेघर झाले. या नैसर्गीक आपत्तीत अनेकांचा बळी गेला. या नैसर्गीक आपत्तीचा सामना करणाºयांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी फुल नाही पण फुलाची पाकळी या म्हणी प्रमाणे ज्येष्ठ व युवक वर्गानंी पुरग्रस्त लोकांना मदतीचा हात देत धान्य स्वरुपात हातभार लावला आणि मदत गोळा केली. या मध्ये प्रामुख्याने प्राचार्य डिगांबर मवाळ, साहेबराव लांडे, जानोजी हुंबाड, संदीप मवाळ, संतोष हुंबाड, सुरेश हुंबाड, गणेश हुंबाड, भिका काळे, बालु बदर, गुलाब गुळचकर, गणेश बागल, मदन हुंबाड, नारायण हुंबाड, रवि लांडे, पंढरी लांडे, नितीन मवाळ, गोपाल मवाळ, अशोक जमधाडे, गजानन जमधाडे, इत्यादी मंडळीनी मोलाचे सहकार्य केले.
महागाव येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी काढली मदतफेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 4:24 PM