-----
पीक पाहणी कार्यक्रम
वाशिम : तालुक्यात कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत पिकावरील कीड व रोग याबाबत निरीक्षणे घेतली जातात. आता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, काही गावांना मंगळवारी भेटी देऊन कृषी विभागाने पीक पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
-------
२५ वाहनांवर दंडात्मक कारवाई
दगड उमरा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यात २९ जून रोजी नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच कागदपत्रे न ठेवल्याप्रकरणी १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
------
बाभूळगाव परिसरात उघड्यावर शौचवारी
वाशिम : दगड उमरा येथून जवळच असलेल्या बाभूळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर शौचवारी होत असल्याने गाव परिसरात घाण पसरून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
-----------
घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला
वाशिम : मानोरा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम इंझोरी येथे काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, धूर फवारणीची मागणी होत आहे.
---------
तीन सापांना जीवदान
वाशिम : वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन प्रणीत निसर्ग स्पर्श संघटनेच्या सर्पमित्रांनी मंगळवारी विविध ठिकाणी आढळून आलेल्या दोन विषारी सापांसह धामणीला पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. यात डुरक्या घोणस, कवड्या या विषारी सापांचा समावेश आहे.