वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुषंगाने संबंधित त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्यास धडक कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात वाशिमचे जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांच्याशी साधलेला हा संवाद.
निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे?एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, पुर्वीची सर्व प्रक्रिया सुरळितपणे आटोपली असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक होणाºया कुठल्या ग्रा.पं.चा समावेश आहे?येत्या १५ जानेवारीला जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव तालुक्यातील ३०, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात वाशिम तालुक्यातील अनसिंग, रिसोडमध्ये रिठद, मालेगावातील शिरपूर, कारंजातील उंबर्डा बाजार यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.
आचारसंहितेविषयी काय सांगाल?निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाºयांना आचारसंहितेच्या कालावधीत कुठेही करता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.