कारंजा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ५ मार्च रोजी कारंजा उपविभागीय कार्यालयात सर्व शासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, दुकानांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कारंजा शहर व तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभाग, नगरपरिषद व ग्रामपंचायतींकडून दंडात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व दुकानांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेमार्फत २ पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच पोलीस विभाग, ग्रामस्तरीय समितीमार्फतही दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. नगरपरिषदेच्या पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्या २४ व्यक्तींवर, तसेच एका दुकानावर दंडात्मक कारवाई केली. यामधून १७ हजार रुपये दंड वसूल केला. होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपरिषदेने ३३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस विभागाने मास्क न वापरणाऱ्या ४५ व्यक्तिंना २२ हजार ५०० रुपये दंड आकारला. मास्क न वापणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तींकडून शनिवारी दिवसभरात ११ हजार २५० रुपये दंड वसूल केला. वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; ७० हजारांचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:38 AM