जिल्ह्यातील २२९२ युवकांना प्रशिक्षण
वाशिम : कोविड-१९ साथीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित सेवांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला हाेता. यामध्ये जवळपास २२९२ युवक-युवतींना ३६ विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.
कोविड काळातील मानधन द्या
वाशिम : कोरोना काळात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना कोविड काळातील मानधन तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर व हॅण्डग्लोज मिळावेत, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मानधन देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
रीडिंग न घेताच वीज देयके
वाशिम : रिसोड, वाशिम, मालेगाव शहरांतील अनेक ग्राहकांना मीटर रीडिंग न घेताच वारेमाप देयके आकारण्यात येत असल्याने ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. मीटर रीडिंग न घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.