कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. ही बाब गंभीर असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता नागरिकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा यापेक्षाही कडक लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
शेलूबाजार ही एक मोठी बाजारपेठ असून, या बाजारपेठेशी जवळपासची ४० खेडी जुळलेली आहेत. तीन दिवसांपूर्वी लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे विनाकारण बाजारपेठेत फिरणाऱ्या व विनामास्क वाहनधारकांवर स्थानिक वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तीन दिवसांत विनामास्क व ट्रिपल सीट दुचाकी चालकांना २१ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट गृहीत धरून शासनाकडून उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात असताना नागरिकांकडूनही खबरदारी घेण्याची गरज आहे.