लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाहतूक नियमाला कोलदांडा देणाºया वाहनधारकांविरूद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कारवाईची मोहिम हाती घेतली असून, ६ फेब्रुवारी रोजी ६३ जणांविरूद्ध कारवाई केली. यामधून शासनाला २.२५ लाख रुपये महसूल वसूली होण्याचा अंदाज आहे.रस्ते अपघात कमी करणे, दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी वाहन चालकांसाठी ‘हेल्मेट’ सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. पोलीस यंत्रणा, वाहतूक शाखा व अन्य प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून दंडात्मक कारवाईची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. दुचाकी चालविणारा आणि मागे बसणाºयालाही हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे नवीन दुचाकी घेताना संंबंधित वाहनधारकाला दोन हेल्मेट घ्यावे लागणार आहेत. सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू असून, वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहनधारकांना केले जात आहे. तथापि, वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कारवाईही केली जात आहे. ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती या कार्यालयासमोर दुचाकीस्वार हेल्मीट न घालणे, मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट, कार चालवत असतांना सीट बेल्ट न लावणे याप्रकरणी कारवाई करण्यात आली. एकूण ६३ वाहनधारक दोषी आढळले असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. सदर कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदशनात वाहतूक निरीक्षक एस.यू. पवार, एच. ए. पोद्दार, अंबरते, लिपिक शेर खान, संदीप राठोड, अक्षय राठोड, प्रवीण धवस, जयसिंग राठोड, डी.एल. बढे यांनी पार पाडली.
वाहतूक नियमाला कोलदांडा; ६३ जणांविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 5:43 PM