भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्ती हे सण उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करतो. वसंत ऋतूचे आगमन होताच प्रत्येकाला होळी या सणाची चाहूल लागते. साधारणतः दिवाळीनंतर साजरा होणारा उन्हाळ्यातील हा महत्त्वाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला प्रत्येक जण एकमेकांना रंग लावतो. परंतु हल्ली रासायनिक घटकांपासून निर्मित रंग बाजारामध्ये असल्याने त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठी रंगाचा वापर अत्यंत हानीकारक आहे त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांनी शपथही घेतली. नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा आयोजनासाठी हॅपी फेसेस द काॅन्सेप्ट स्कूलचे संचालक दिलीप हेडा, कविता हेडा, प्राचार्य सिद्धार्थ चौबे व समन्वयक अभिजित पाठक यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शिक्षक राम धनगर यांनी परिश्रम घेतले.
नैसर्गिक रंग निर्मितीची आभासी कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:41 AM