शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

लॉयन्स क्लबच्या दृष्टी उपक्रमाची लिमका बुकमध्ये नोंद

By admin | Published: May 19, 2017 7:42 PM

एकाच वेळी एक लाख ४० हजार विद्यार्थी यशस्वी नेत्र तपासणी

ऑनलाइन लोकमत
वाशिम : लॉयन्स क्लबच्यावतीने राबविण्यात आलेल्या दृष्टी उपक्रमाची नोंद लिमका बुक या आंतरराष्ट्रीय पुस्तकात  करण्यात आली आहे अशी माहिती दृष्टी उपक्रमाचे संयोजक व व्दितीय प्रांतपाल डॉ.संजय वोरा यांनी शुक्रवारी दिली. 

लॉयन्स क्लबचे व्दितीय प्रांतपाल एमजेएफ डॉ. संजय वोरा यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लॉयन्स क्लब इंटरनॅशनल डिस्टीक ३२३ एचटू अंतर्गत वाशिम जिल्हायासह औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बुलढाणा, हिंगोली, अकोला भुसावळ, जळगाव खा., धुळे व नंदुरबार याना १३ जिल्हयामध्ये ८ आॅक्टोबर २०१५ मध्ये दृष्टी हा उपक्रम एकाच दिवशी व एकाच वेळेत राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये तब्बल एक लाख ४० हजार ३८८ विद्यार्थी व विद्यार्थींनीची नेत्र तपासणी करण्यात आली होती. मल्टीपक चेअरपरसन लॉ.कुलभुषण मित्तक इंदौर व गव्हर्नर लॉय.एम.के.अग्रवाल यांचा प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या दृष्टी उपकराची लिमका बुधमध्ये नोंद व्हावी यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये १३ जिल्हयातील २५० शाळांनी सहभाग घेतला होता. तर ३ हजार दोनशे शिक्षकांच्या सहकार्याने एक लाख ४० हजार ३८८ विद्यार्थ्यांनी नेत्रदृष्टी तपासणी करुन घेतली होती. लॉयन्स सर्व पदाधिकारी सदस्य व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने यशस्वी ठरलेल्या दृष्टी उपक्रमाचे मुख्य आयटीसेंटर स्थानिक लॉयन्स विद्यानिकेतन येथे उभारण्यात आले होते. सदर दृष्टी उपक्रमाची नोंद विश्व विख्यात लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याचे प्रमाणपत्र १७ मे रोजी  प्रांतपाल लॉ.डॉ.संजय वोरा यांना मिळाले असून डॉ.वोरा यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे.