यावेळी विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
ग्रामपंचायतीचेवतीने सर्व सोयींनी युक्त आरोग्य वर्धिनी केंद्राच्या नवीन इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, पुरूष तथा महिला मंडळींसाठी निवासाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे यांनी तातडीने विलगीकरण कक्ष सुरू केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची प्रशंसा करत फारशी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाला या विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी पोलीसपाटील उमेश देशमुख, सरपंच राज चौधरी, उपसरपंच रघुनाथ भगत, वहीदभाई, अरूण उघडे, अरूण इंगोले, शरद पचगाडे यांच्यासह कारंजा ग्रामीण पोलीस स्थानक गुप्तवार्ता विभागाचे विष्णू मुसळे आदींची उपस्थिती होती.