लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरि विठ्ठल च्या जयघोष, टाळमृदंग विणेचा नाद करीत श्रध्दायुक्त विठ्ठल नामाच्या गजराने एैतिहासीक वाशिम नगरी ४ जुलै रोजी दुमदुमली. शहरासह जिल्हयातील प्रत्येक विठ्ठल मंदिरात आज भाविकांची विठुरायाच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी झाली होती.वाशिम शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. शुक्रवार पेठ, विठ्ठल मंदिर व देवपेठ मधील विठ्ठल मंदिरासह, आयुडीपी , लोटांगण महाराज संस्थान, विठ्ठलवाडी व ठाकुर यांच्या कडील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासून अभिषेक, महाआरती, पूजन, भजन किर्तन, हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रम व उत्सव उल्हासमय व आनंदमय भक्तीपूर्वक वातावरणात पार पडले. टाळमृदंगाचा नाद व विठ्ठल नामाचा गजर करीत शोभयात्रा व दिंडीने शहरातून मार्गक्रमण केल. देवपेठ येथील विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच मोठया प्रमाणात गर्दी होती. अभिषेक, पुजा, अर्चना आदी धार्मिक कार्यक्रमघेण्यसात आले. याकामी देवपेठ मित्रमंडळीचे सहकार्य लाभले. विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात अभिषेक पुजन हरिपाठ , भजन, व प्रसाद वाटप कार्यक्रम पार पडले. विठ्ठलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरात फराळी खिचडीचा वाटप करण्यात आला. जुनी आययुडीपी येथील दत्तात्रय इथापे यांच्या विठ्ठल मंदिरात पुजा, अभिषेक, महाआरती, भजन, किर्तन, हरिपाठ, आदी धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले. विठ्ठल दर्शनासह फराळी उसळीचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी इथापे परिवार व मित्रमंडळाने परिश्रम घेतले.