-चंद्रभागाबाई दत्तूजी भोयर
00000000000000
२५ वर्षांपासून पंढरीची वारी
कोरोनामुळे यंदाही पालखी सोहळ्याचा लाभ घेता येणार नाही, याचे शल्य मनाला बोचत आहे. मी २५ वर्षांपासून पंढरीची वारी अखंडित करीत आलो आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा वारी खंडित झाली. दरवर्षी वारीत सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात वारीचा आनंद घेतला जायचा. यंदाही या आनंदापासून मुकावे लागणार आहे. वारकऱ्यांसाठी पंढरपूरची आषाढी वारी अतिशय महत्त्वाची असते. तेथे वारकऱ्यांचा मेळा जमतो. यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येणार नाही. त्यामुळे गावातच राहून आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
- हभप एकनाथ महाराज भिंगारे
000000000
घरीच राहून विठुनामाचे स्मरण करू
मी २१ वर्षांपासून अखंडपणे संत सातारकर महाराज संस्थानच्या पालखीसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतो. गेल्या २१ वर्षांत अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र, वारीत कधीही खंड पडू दिला नाही. गेल्यावर्षी कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे वारीला जाता आले नाही. यावर्षीदेखील कोरोनामुळे वारीला जाता येणार नसल्याने सलग दुसऱ्या वर्षीही वारी खंडित होत आहे. आषाढी एकादशीला सर्व संतांची मांदियाळी पंढरीला अवतरते. परंतु यावर्षी कोरोनामुळे या संतांच्या मांदियाळीला मुकावे लागणार असल्याचे दु:ख आहे. परंतु जगावर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंढरपुराला जाऊनच प्रार्थना केल्यापेक्षा घरी बसून प्रार्थना केल्या जाईल.
- हभप पंडितराव नारायणराव देशमुख
00000000000