- नंदकिशोर नारे वाशिम - वाशिम लोकसभा व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय प्राप्त करणाऱ्या खासदार भावना गवळी यांच्या विजयाबद्दल त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : आपल्याला जनतेनी निवडून दिले याबद्दल काय सांगाल ?उत्तर : हा माझा विजय नसून जनतेचा विजय आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी देशाचा विचार करुन मतदान केले. जनता हुशार, चाणाक्ष झालेली आहे, कोणाला सत्तेवर बसवायचे व कोणाला नाही चांगले अवगत आहे. देशाचा विचार करीत जनतेनी मतदान केले.आपल्या विजयाचे शिल्पकार कोण ?नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मतदान केले. माझ्या विजयाचे शिल्पकार संपूर्ण जनता जनार्दनासह माझ्यासाठी रात्रंदिवस झटलेले माझे भाऊ -बहिणी व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते होत.या निवडणुकीत आपणास सर्वांचेच सहकार्य लाभले का?माझ्या विजयावरुन मला असे वाटत नाही की मला कोणाचे सहकार्य लाभले नाही . सर्वांनी मेहनत केल्याने व मतदारांनी सुध्दा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने हा विजय झाला.निवडणूक म्हटली की थोडाफार विरोध चालतच असतो तो कायमस्वरुपी नसतो.मतदारसंघाच्या विकासाबाबत काय सांगाल?माझ्या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीच तडा न जावू देता विकासास कटीबध्द आहे.
मतदारांनी देशाच्या विकासाचा विचार केला - भावना गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 3:03 PM