०००
गावाच्या विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा तसेच विविध याेजनेंतर्गतची कामे खेचून आणण्याचा मानस आहे. गावातील रस्ते, नाली, पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न राहील.
- अमोल प्रदीपराव देशमुख,
सदस्य, ग्रामपंचायत वाकद
००००
गावाचा विकास साधण्याबरोबरच युवकांसाठी काहीतरी नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रलंबित समस्या निकाली काढून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल.
- घनश्याम लाड,
सदस्य, ग्रामपंचायत चिखली
०००
शिरपूर गावामध्ये असलेली सांडपाणी समस्या, रस्त्याची दुरवस्था या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न करू. गावात स्वच्छता राहील यासाठी विशेष प्रयत्न करू. या कामी इतरांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
- शंकर देशमुख,
सदस्य, ग्रामपंचायत शिरपूर जैन
००
युवावर्गासाठी उपक्रम
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी युवक, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उभारणी केली आहे. विद्यार्थीदशेत असताना करिअरला चांगली दिशा मिळावी यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका उभारण्याचा मानस काही युवा सदस्यांनी व्यक्त केला.
००
वाशिम, मालेगाव तालुक्यांत सर्वाधिक युवा सदस्य
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा उमेदवारांचा भरणा सर्वाधिक असल्याचे दिसून आले. युवा उमेदवार सर्वाधिक संख्येने विजयी झाले आहेत. अन्य तालुक्यांच्या तुलनेत वाशिम, मालेगाव तालुक्यांत युवा उमेदवार जास्त संख्येने निवडून आले.
००
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती १५२
निवडून आलेले उमेदवार १२३३
१८ ते ३२ वयोगटातील विजयी ७७६