नंदकिशोर नारे, वाशिम :वाशिम विधानसभा मतदार संघाच्या मतदानास ७ वाजतापासून सुरुवात झाली . वाशिम येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता प्रथम मतदान करण्याचा मान वाशिम येथील वार्ड क्रमांक १ मधील रहिवासी संतोष काळे यांना मिळाला . मतदान केंद्रावरील कर्मचारयांनी त्यांचे स्वागत केले.
मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजण्यापूर्वीच काही मतदार मतदान करण्यासाठी येऊन बसले होते . मतदान केंद्रावर वेळेवर मतदानास सुरुवात झाली . या मतदान केंद्रावर ७ :१५ वाजेपर्यंत १५ मतदारांचे मतदान झाले होते . तसेच वाशिम येथील राजस्थान कॉलेज या मतदान केंद्रावर ७ : ४५ वाजेपर्यंत १५ जणांचे मतदान झाले . ८ वाजल्यानंतर मतदार येण्यात वाढ दिसून आली. मतदान केंद्रावर मतदारांना सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले .
प्रत्येक मतदार केंद्रावर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मार्गदर्शनासाठी व स्वागतासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ठेवण्यात आले आहेत