कारंजा लाड (जि. वाशिम): महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची जीवंत तार तुटून अंगावर पडल्याने ३0 वर्षीय महिला जखमी झाली. ही घटना आज (ता.१२) रोजी सकाळी ११ वाजताच्या स्थानिक भगतसिंग चैकासमोरील आठवडी बाजार रस्त्यावर घडली. येथील इमामपुर्यातील शकीला रहीम मिरावाले आपल्या दोन वर्षीय मुलासोबत बाजारपेठेत खरेदीसाठी आली होती. दरम्यान, एका ट्रकमुळे जीवंत विद्युत तार तुटून या महिलेच्या अंगावर पडली. या घटनेत महिलेच्या नाक तथा कपाळावर जखम झाली. दरम्यान, नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती विज वितरण कंपनीला दिली. कंपनीने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर महिलेला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. वीज कंपनीच्या अधिकार्यांनी सदरील महिलेची भेट घेतली.
विद्यूत तार अंगावर पडून महिला जखमी
By admin | Published: August 13, 2015 1:14 AM