- शंकर वाघ मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही. अकोला-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट या बायपासचे काम होणार कधी, ही प्रतिक्षा वाहनधारकांसह नागरिकांना लागली आहे.मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शेलूफाटा रस्त्यावर तहसील कार्यालय, विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तसेच याच रस्त्याच्या परिसरात वीज वितरण कार्यालय असून, पंचाय समिती, ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारे मार्ग आणि बसस्थानक असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही वर्षांपूर्वी अकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली. त्यामुळे आधीच वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि तहसील कार्यालय व बसस्थानकासमोर वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली. वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी धोकादायक ठरत आहे. त्यातच नवरात्री उत्सवानिमित्त जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मालेगाव ते नागरदास या मार्गावर हजारो भाविक सकाळी ४.३० वाजतापासून पायदळ जात असतात. यामुळे नागरदास-अमानी या प्रस्तावित बायपासचे काम होणे आवश्यक आहे. साधारण ८ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार दिवंगत सुभाष झनक यांच्या प्रयत्नांमुळे या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता अकोला-हैद्राबाद या महामार्गात समाविष्ट करण्यात आला आणि कामाचे अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आले. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही. अद्यापही मार्गावर दरदिवशी शेकडो वाहने धावत असून, भरधाव वाहनांमुळे अपघाताची भिती निर्माण झाली असतानाही या रस्त्याचे काम करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.
मालेगावातील बायपासची प्रतिक्षा संपेना; काम अडकले लालफितशाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:11 PM
मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही.
ठळक मुद्देकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली. या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही.