मानोरा (जि. वाशिम): तालुक्यातील गिरोली, आसोला खुर्द, खापरदरी, गिर्डा, फुलउमरी, रुई, गोस्ता, शेंदुरजना अढाव, आदीसह अनेक गावातील शेतकर्यांच्या शेतजमिनी शासनाने २५ ते ३0 वर्षांपूर्वी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासन सेवेत समाविष्ट करण्याचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले; मात्र शासनाने अद्यापही नोकरी न दिल्याने सुशिक्षित बेरोजगार म्हणून जगण्याची पाळी प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे व वयोर्मयादेतून बाद झालेल्यांना व्यवसायासाठी प्रत्येकी १0 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे प्रकल्पबाधित व्यक्तींच्यावतीने बुधवारी तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले आहे.
प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा
By admin | Published: July 24, 2015 1:20 AM