----------------
रिसोड तालुक्यात सहा बाधित
रिसोड: तालुक्यातील आणखी सहा व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाकडून मंगळवार १२ जानेवारी रोजी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार रिसोड शहरातील १, व्याड येथील १, वनोजा येथील १, मोप येथील १, चिंचाबा येथील १, जांब येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
-------------------
२१ शेतकरी पीक कर्जापासून वंचित
मेडशी: शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणीकरण करता आले नाही. त्यात मेडशी येथील १३१ शेतकऱ्यांचा समावेश होता. आधार प्रमाणीकरणानंतरही मेडशीतील २१ शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले.
---------
झुकलेल्या वीजखांबांची दुरुस्ती
पोहरादेवी: परिसरातील शिवारात वादळी वाऱ्याने झुकलेले विजेचे खांब अनेक महिन्यांपासून जैसे-थे होेते. या खांबांमुळे अपघाताची भीती होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांंकडून खांब सरळ करण्याची मागणी करण्यात येत होती. कामरगाव येथील महावितरणच्या अभियंत्यांनी याची दखल घेत सोमवारपासून हे खांब सरळ करण्यास सुरुवात केली.
---------
नदीवरील बंधाऱ्यांची दुरवस्था
आसेगाव : मंगरुळपीर तालुक्यातील चिंचोली आणि आसेगावदरम्यान वाहणाऱ्या भोपळपेंड नदीवर उभारलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने या नदीपात्रात पाणी थांबत नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत; परंतु गतवर्षभरापासूनही संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन या बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.