कारंजा लाड: नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर विविध बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न केले. कारंजा बाजार समितीचाही त्यामध्ये समावेश आहे; परंतु बाजार समित्यांच्या प्रयत्नानंतरही हजारो शेतकऱ्यांची तूर मोजणीविना यार्डवर पडून आहे. जिल्ह्यात नाफेडकडे आलेल्या तुरीपैकी ३० हजार क्ंिवटलच्यावर तुरीची मोजणी शिल्लक आहे. यामध्ये कारंजा बाजार समितीच्या यार्डवर १५० शेतकऱ्यांची चारहजार क्विंटल तूर असून, याच बाजार समितीच्या बाहेर नाफेडकडे मोजणीसाठी आलेली १० हजार क्विंटल तूर आहे. कारंजा बाजार समितीने निर्धारित मुदतीच्या आत टोकण दिलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ५६० शेतकऱ्यांच्या तुरीची अद्यापही मोजणी झाली नसून, यामधीलच काही शेतकरी आपली तूर बाजार समितीच्या बाहेर वाहनांत भरून उभे आहेत. जिल्ह्यातील नाफेडच्या केंद्रावर मोजणीसाठी प्रतिक्षेत असलेल्या एकूण तुरीपैकी कारंजा बाजार समिती यार्डावर आणि बाहेर मिळून १५ हजार क्विंटल आहे. कारंजा बाजार समिती प्रशासनानेच नाफेडकडे विक्रीसाठी शेतकऱ्याच्या नावावर आणलेली १२५ क्विंटल तूर पकडून या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य गैरप्रकाराला आळाही घातला होता, हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. बाजार समिती सभापतीकडून शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थामंगरुळपीर: कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत ठाकरे याच्याकडुन नाफेड तुर विक्रीकरीता आणलेल्या शेतकऱ्यांना मोफत जेवण व शुध्द पाणी पुरवठ्याची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाफेडची खरेदी ४८ तासांच्या आत पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी सोमवारी मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
कारंजात सर्वाधिक तूर मोजणीच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: April 26, 2017 1:22 AM