मालेगाव: तालुक्याच्या अद्ययावत प्रथमश्रेणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी १ कोटी रुपये खर्चून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर दीड वर्षापूर्वी भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु सर्व काम झाल्यानंतरही या ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. त्यामुळे अद्यापही शिरपूर येथील जुन्याच इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक प्रथम श्रेणी कार्यालय शिरपूर येथे आहे. या कार्यालयाची जुनी इमारत ही खूप जुनी आणि अपुरी असून, परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. दुय्यम निबंधकांचे कामकाज सुरळीत व्हावे, त्यासाठी प्रशस्त आणि सुसज्ज जागा असावी म्हणून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर या कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी जागा राखीव करण्यात आली. या इमारतीच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर रडतखडत हे काम दीड वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. तथापि, इमारतीच्या आवाराला असलेल्या कुं पणांच्या दोन भिंतीचे काम निधीअभावी रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो अडथळा दूर करताना तार कूंपण लावले आता या कुंपणाला प्रवेशद्वार लावणे बाकी असून, तेसुद्धा तयार झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ईमारतीचे हस्तांतरणही संबंधित प्रशासनाला केले आहे. तथापि, अद्यापही या इमारतीचे लोकापर्ण झाले नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार अद्यापही जुन्याच ईमारतीत सुरू आहे. येथे पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि जागेचा अभाव यामुळे येथे येणाºया तालुकाभरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर नव्या प्रशासकीय ईमारतीचे लोकापर्ण करावे, अशी मागणी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.
शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला प्रतीक्षा लोकापर्णाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 4:01 PM
मालेगाव: तालुक्याच्या अद्ययावत प्रथमश्रेणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी १ कोटी रुपये खर्चून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर दीड वर्षापूर्वी भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु सर्व काम झाल्यानंतरही या ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही.
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाने या ईमारतीचे हस्तांतरणही संबंधित प्रशासनाला केले आहे. इमारतीचे लोकापर्ण झाले नाही, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार अद्यापही जुन्याच ईमारतीत सुरू आहे.