---
उंबर्डा बाजार मंडळात ९५ टक्के पेरणी
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार महसूल मंडळात २० जूनपर्यंत नियोजित क्षेत्राच्या ९५ टक्केच पेरणी झाली आहे. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
-----
महामार्गाच्या कडा भरण्यासाठी मातीचा वापर !
वाशिम : वाशिम-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असतानाच या महामार्गाच्या कडा भरण्यासाठी काळ्या मातीचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात पावसामुळे ही माती वाहून खड्डे पडणार आहेत, तर रस्त्यावर चिखल पसरून वाहने घसरण्याची भीतीही आहे.
------
दापुरा परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : मानोरा तालुक्यातील दापुरासह परिसरात खरीप पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारपासून कृषी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग राखून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
------
ग्रामीण भागांत कनेक्टिव्हिटीचा अभाव
धनज बु. : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे.
------
काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची चाळणी
काजळेश्वर : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर डांबरीकरण निघून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठा त्रास होत आहे.
^^^^^^
पाणंद रस्त्याची दुरवस्था
वाशिम : कामरगाव परिसरातील काही पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यात गत आठवड्यात आलेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यांवर मोठमोठ्या नाल्याच तयार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची वहिवाटच बंद पडली आहे.