लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २00 रुपये दराने मदत देण्याची घोषणा केली. या मदतीसाठी पश्चिम वर्हाडातील जवळपास पावणेदोन लाख शेतकर्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले; परंतु अद्याप शेतकर्यांना अनुदान मिळालेले नाही. अद्याप शासनाकडून यासाठी निधीची तर तूदच झाली नसल्याचे समजते. गतवर्षी विपरित हवामानामुळे सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले, तसेच अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी वर्ग हताश झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने या शेतकर्यांना प्रति क्विंटल २00 रुपये आणि अधिकाधिक २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानासाठी १ लाख ४५ हजार ५६५ प्रस्तावही पाठविण्यात आले. परंतु अद्याप अनुदान मिळाले नाही.
अद्याप या अनुदानासाठी शासनाकडून निधीची तरतूद झालेली नाही. ती होताच निर्धारित पद्धतीनुसार अनुदानाचे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.- डॉ. ए. बी. जोगदंड, संचालक, महाराष्ट्र राज्य, पणन संचालनालय, पुणे