लोकमत न्यूज नेटवर्कपांडवउमरा (वाशिम) : संततधार पावसामुळे पांडवउमरा येथील गजानन दत्ता कालापाड यांच्या घराची भिंत ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास कोसळली. सुदैवान त्यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही.गत तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. ३१ जुलैच्या पहाटेदरम्यान गजानन कालापाड यांच्या घराची २५ फुट लांबीची विटा-मातीची भिंत कोसळली. सुदैवाने तेथे कुणी उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी नाही. पांडवउमरा गावात काही नागरिकांच्या घराच्या भिंती शिकस्त आहेत. संततधार पावसामुळे शिकस्त भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने गावाला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी गावकºयांमधून होत आहे. कालापाड यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा, अशी मागणी कालापाड यांच्यासह गावकºयांनी केली.
संततधार पावसामुळे भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:57 PM