वाशिम: शहरामध्ये बुधवारी एक वाजेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
यंदा वाशिम जिल्ह्यात ७० टक्क्याच्या आसपास पर्जन्यमान झाले; परंतू टक्केवारी घटण्यासोबतच हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने मध्यम आणि लघूप्रकल्पांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. एकीकडे पावसाची स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे कडक उन्ह तापत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
अशात बुधवारच्या ढगाळी वातावरणात पावसाने हजेरी लावली. वृत्त लिहिस्तोवर पाऊस जोमाने सुरुच होता. असाच पाऊस सुरु राहल्यास शहरातील पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पावसामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.