मानोरा शहरापासून ८ कि. मी. अंतरावर व डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव येथे २०० लोकसंख्या व ४५-५० घरांची वस्ती आहे. येथे जिल्हा परिषदेची ४ थीपर्यंत शाळा आहे. अभईखेडा या ग्रामपंचायतीला हे गाव जोडलेले असून, येथे भवानी मातेचे जागृत देवस्थान आहे. चैत्र महिन्यात नवरात्रीच्या उत्सवात तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी या गावात उसळते. मोठ्या श्रद्धेने येथे सतत नऊ दिवस अनवाणी चिखल-मातीचा रस्ता तुडवत भाविकांना यावे लागते. डोंगरगावचे गावकरी रस्त्याविना मरणयातना भोगत असून, अनेकवेळा आजारी व गरोदर मातांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. येत्या आठ दिवसांत या रस्ता कामास सुरुवात न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शासन व प्रशासनाला दिला आहे.
रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदाेलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:28 AM