लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग (माध्यमिक) जि.प.वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी आयोजित विज्ञान मंच निवड चाचणी परीक्षा जिल्ह्यातील १४४ विद्यार्थ्यांनी दिली.राज्य विज्ञान संस्था नागपूर व वाशिम जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान मंच परिक्षा २०१९ चे आयोजन स्थानिक बाकलीवाल विद्यालय वाशिम येथे केले होते. यामध्ये वाशिम, रिसोड, मालेगांव येथून आलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थींनी ही परीक्षा दिली. ग्रामीण भागातून ७० तर शहरी भागातून ७४ असे एकुण १४४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे यांनी भेट पाहणी केली. या परिक्षेला केंद्रसंचालक म्हणुन आशिष विभुते यांनी कामकाज पाहिले तर शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी, प्रेमा सानप, आनंद कळमकर, गोपाल जोशी, ज्ञानेश्वर राऊत, भाग्यश्री ऐडके, संदिप कुळकर्णी यांनी सहकार्य केले.
वाशिम : १४४ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 3:51 PM