लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास १५० केंद्रांमध्ये स्वच्छतागृहाचा अभाव आहे. स्वच्छतागृह, शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेवराव सोळंके यांनी केली आहे.बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर असून, जिल्हयात एकूण १०७६ अंगणवाड्या आहेत. काही अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही तर काही ठिकाणी स्वतंत्र इमारत असूनही स्वच्छतागृह व शौचालयाचा अभाव आहे. ग्रामीण भागात सर्व कुटुंबांकडे स्वच्छतागृह असावे, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. याप्रमाणेच सर्व अंगणवाडी केंद्रातही स्वच्छतागृह व शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. निधीअभावी स्वच्छतागृह व शौचालयाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. स्वच्छतागृहाअभावी महिला कर्मचाºयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनस्तरावरून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा आणि या निधीतून अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी सोळंके यांनी के
वाशिम : जिल्ह्यात १५० अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहांचा अभाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 6:12 PM