शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:21 PM

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. दरम्यान, पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची पुर्नपडताळणी केली जात आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या पाहणीनंतर प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रात पीक नुकसान झाल्याचे दिसल. त्यानंतर प्रशासनाने या पंचनाम्याची पडताळणी व ‘डाटा एन्ट्री’ची प्रकिया पूर्ण केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, या नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला आहे. त्यात जिरायत, बागायत आणि फळपिकांचाही समावेश आहे. आता या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांचे वितरण करावे लागणार आहे.दरम्यान, कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांची पुर्नपडताळणीही करण्यात येत आहे. तथापि, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुधारणाही अहवालात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. अडचणी सापडलेल्या शेतकºयांकडून मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तयार करून ‘डाटा एन्ट्री’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात शासन निर्णयदेखील अद्यापपर्यंत निघाला नाही. यामुळे शेतकरी पुरते संभ्रमात सापडले आहेत. तथापि, शासनाने शेतकºयांची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून जोर धरत आहे. या विषयाकडे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी