लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या दोन दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या दोन दिवसातच ६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या दोन दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णसंख्या जुलैच्या तुलनेत अधिक झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.आॅगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी २६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. २ आॅगस्ट रोजी एकूण ४१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये कारंजा शहरातील सर्वाधिक २७ रुग्णांचा समावेश आहे. १ आणि २ आॅगस्ट अशा दोन दिवसात ६७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६६१ वर पोहोचली असून, त्यातील १६ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ४२० लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय यासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे आता २२४ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे १ आॅगस्ट आणि २ आॅगस्ट या दोन दिवसात एकूण ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेतही भर पडली आहे. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण केले जात असून, संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत.
४२० जणांना डिस्चार्जजिल्ह्यात आतापर्यंत ४२० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने ही बाब जिल्हावासियांना दिलासादायक आहे.