शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

वाशिम : भरधाव पिकअपने उडवले, एक जण जागीच ठार

By नंदकिशोर नारे | Published: July 09, 2024 4:05 PM

ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा रिसोड-मेहकर मार्गावर मोठेगाव बस स्टॉपनजीक थरार

वाशिम  : मद्य प्राशन करून भरधाव वेगाने पिकअप वाहन चालकाने धडक दिल्याने एका विवाहित युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी रात्री आठ वाजता रिसोड मेहकर मार्गावर मोठेगावच्या बसस्टॉपनजीक ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नारायण परबत कष्टे (वय २८ वर्षे, रा. मोठेगाव), असे मृतकाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेल्या दोघा-तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी पिकअप चालक सचिन कौतिक मुकीर, रा. जांभूळ, ता. लोणार, जि. बुलढाणा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सचिन कौतिक मुकीर हा एम.एच. २८ व्ही.व्ही. ६५८३ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने रिसोडकडून मेहकरच्या दिशेने निघाला होता. सचिन मुकीर हा मद्य प्राशन करून बेधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. रात्री आठ वाजता त्याने भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून नारायण कष्टे यास जबर धडक दिली. या धडकेत नारायण कष्टे याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर पिकअप वाहनही काही अंतरावर जाऊन पलटी झाले. याबाबतची माहिती मिळताच बस स्टॉपवर जमलेल्यांसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पिकअप चालक सचिन मुकीर यास ताब्यात घेतले. अपघातात ठार झालेला नारायण कष्टे हा अत्यंत गरीब हलाखीच्या परिस्थितीत होता. त्याच्यामागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, वाहन चालकास कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोठेगाव येथील ग्रामस्थांनी रिसोड पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली होती. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आराेपी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात