- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था, उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची टंचाई, उड्डाणपूलाचे रखडलेले काम यासह विविध समस्या कायम असल्याने वाशिम विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते.वाशिम विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाचे लखन मलिक करीत आहेत. या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली नाही. एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढली तर उन्हाळ्यात वाशिम शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही. परंतू, या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. वाशिम तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्नही निकाली निघाला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील समस्या निकाली काढण्यात आमदारांना फारशे यश आले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत आहेत.
तालुका क्रीडांगण रखडले!महाराष्ट्र राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडांगण उभारण्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला. वाशिम तालुका आणि मंगरूळपीर तालुक्यात क्रीडांगणे उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्यामुळे तीन कोटींचा निधी वाशिमला मिळू शकला नाही.एकबुर्जीची भिंत रखडली!वाशिमकरांचे पाणी एकबुर्जी प्रकल्पातून दरवर्षी वाहून जाते. एकबुर्जी प्रकल्पाची भिंत उंच करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; मात्र आमदारांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. निधी आणण्यापासून तर भिंत उंच करण्यापर्यंतच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांचा आहे.अडीच वर्षांपासून पुसद मार्गावरील उड्डाणपूल ‘जैसे थे’वाशिमच्या विकासात भर पडणाºया पुसद मार्गावरील उड्डाणपूल आहे; मात्र गत अडीच वर्षांपासून उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे हद्दीमुळे थांबले आहे. रेल्वे हद्दीतील बांधकाम झाल्याशिवाय उड्डाणपूल पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे वाशिमकरांना आणखी किमान दोन वर्षे उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दोन वर्षांत उखडले रस्तेवाशिम शहरातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात झाले; मात्र दर्जा टिकविला न गेल्याने आणि क्युरिंग न झाल्याने दोन वर्षांच्या आत सर्व रस्ते उखडले आहेत. त्यामुळे वाशिमकरांच्या नशिबी पुन्हा खड्डे आले आहेत.
वाशिम विधानसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच वंचित पक्ष त्यांचा उमेदवार घोषित करणार आहे. वंचितची लढाई थेट भाजपशी आहे, येथे काँग्रेस स्पर्धेतच नाही.-डॉ. नरेंद्र इंगळे,वंचित आघाडी, वाशिम.
वाशिमचे भाजपचे आमदार मलिक यांनी कोणता विकास केला, याची माहिती जनतेसमोर ठेवावी, त्या तुलनेत काँग्रेस कार्यकाळात अनेक योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे यंदा मतदारसंघात काँग्रेससाठी चांगली स्थिती आहे.-दिलीप सरनाईक, काँग्रेस, वाशिम.