लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हयात आधार संलग्न बँक खाते नसलेल्या ६१ हजारांपैकी ५८ हजार ९०० शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात (लिंक) करण्यात आले आहेत. उर्वरीत २१ शेतकºयांचे आधार लिकिंग १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.जिल्हयातील ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे. त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकºयांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकº्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०१९ चा लाभ दिला जाणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना त्यांचे खाते आधारक्रमांकाशी कुठल्याही स्थितीत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या बँकेकडून कर्जाची उचल केली आहे, त्या बँकेच्या शाखेकडे आधारकार्ड, बँक पास बुकची झेरॉक्स व भ्रमणध्वनी क्रमांक १५ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याअनुषंगाने आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात आधारसंलग्न खाते नसलेल्या शेतकºयांची संख्या ६१ हजार आहे. ९ जानेवारीपर्यंत यापैकी ५८ हजार ९०० शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आले आहेत. ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांचा यात समावेश आहे. उर्वरीत २१०० शेतकºयांनी १५ जानेवारीपर्यंत बँक खाते आधारशी लिंक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत बँकांनी मिशन मोडवर काम करुन थकीत कर्जदार शेतकºयांचे बँक खाते हे आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नीत करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. शेतकºयांनीदेखील बँक प्रशासनाला सहकार्य करून बँक खाते आधार लिंकिंग करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
वाशिम : ५९ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 3:39 PM