शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Washim: भाजपाची १२६ जणांची जम्बो वाशिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर, महामंत्रीपदी चौघांची वर्णी

By संतोष वानखडे | Published: October 03, 2023 2:40 PM

Washim BJP News: भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी जिल्हयाची १२५ जणांची जम्बो कार्यकारीणी मंगळवारी जाहीर केली आहे.

- संतोष वानखडेवाशिम : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाम बढे यांनी जिल्हयाची १२५ जणांची जम्बो कार्यकारीणी मंगळवारी (दि.३) जाहीर केली आहे.यामध्ये ४ महामंत्री, ११ उपाध्यक्ष, १० सचिव, १ कोषाध्यक्ष, १ प्रसिध्दी प्रमुख, ७ मोर्चा व आघाडयांचे जिल्हाध्यक्ष, २७ प्रकोष्ठांचे जिल्हा संयोजक व ६४ कार्यकारीणी सदस्यांचा समावेश आहे.

महामंत्री नागेश घोपे, प्रा.सुनिल काळे यांची फेरनिवड झाली आहे तर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन लाटे व हेमलता लहुटे यांची नव्याने महामंत्री पदी वर्णी लागली आहे. गत तिन महीन्यांपुर्वी भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद सदस्य शाम बढे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. तेंव्हापासुनच जिल्हावासियांना नव्या जिल्हा कार्यकारीणीची  प्रतिक्षा लागली होती, अखेर मंगळवारी ही प्रतिक्षा संपली. जिल्हाध्यक्ष बढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे, प्रदेश महामंत्री आमदार रणधीर सावरकर, विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव सुरेश बनकर तथा मावळते जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मान्यतेने १२६ पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारीणी घोषीत केली. यामध्ये उपाध्यक्षपदावर उमेश  ठाकरे,  जितेंद्र महाराज राठोड,  विजय पाटील,  अनिल कानकिरड,  धनंजय हेंद्रे, मो.इमदाद मो. अफसर,  अशोकराव सानप ,संतोष मवाळ, सुनिता पाटील, सुनिल राजे व  सुनिल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. सचिवपदी  करूणाताई कल्ले, श्रीकृष्ण मुंदे, शरद चव्हाण, प्रकाश राठोड, प्रिया प्रविण ठाकरे, प्रदिप देशमुख, मेघाताई बांडे, सिध्देश्वर केळे, रेखाताई खंडागळे, अंजली पाठक तर कोषाध्यक्षपदी मिठुलाल शर्मा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली असुन प्रसिध्दीप्रमुख पदाची जवाबदारी जिया अताउल्ला खान यांचेकडे सोपविण्यात आली.

सात मोर्चांचे जिल्हाध्यक्षही जाहिरयुवा मोर्चा - अमोल भुतेकरमहिला मोर्चा -मायाताई वाघमारे,किसान मोर्चा  -गंगादिप राउतओबिसी मोर्चा संतोष मुरकुटेअनु. जाती मोर्चा - रिषभ बाजड,अनु. जमाती मोर्चा - चिंतामण खुळेअल्पंख्यांक मोर्चा - मो.शारीक मो. नाजिम

८ मंडळाचे अध्यक्ष जाहीरजिल्हयातील ९ पैकी ८ मंडळाचे अध्यक्ष जाहीर केले. वाशिम शहर संतोष  शिंदे, वाशिम ग्रामिण प्रल्हाद गोरे, मंगरूळपीर शहर सतिष हिवरकर, ग्रामिण प्रा.हरीदास ठाकरे, कारंजा शहर ललीत चांडक, ग्रामिण डॉ. राजिव काळे, मानोरा ठाकुरसिंग चव्हाण तर रिसोड मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्नील सरनाईक यांची निवड करण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाwashimवाशिम