लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘प्रवाशांच्या सेवेत’ही बिरुदावली घेऊन सर्वत्र मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे वाशिम बसस्थानक मात्र आजघडीला विविध समस्यांचे आगार बनले आहे़ या बसस्थानकासमोर व स्थानकामध्ये घाणीचे प्रचंड प्रस्थ वाढले असून,याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या आसनासमोरुन वराह मुक्तसंचार करताना दिसून येत असताना याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.काही वर्षापूर्वी वाशिम बसस्थानकाचे विभागात नाव होते. हे बसस्थानक उत्पन्नामध्ये विभागात अव्वल होते. येथून अनेक लांबपल्ल्याच्या बसेस सुरु होत्या.परंतु, आज घडीला गत वैभव हवेत उडाले असून, केवळ समस्याच मागे उरल्या आहेत़. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गटार साचले आहे. त्यावर होणाºया डासांच्या उत्पत्तीमुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. फलाटांवरही कचºयाचे ढीग साचलेले आहेत़या बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे पडलेले असून, त्यामध्ये साचणारे पाणी प्रवाशांचे कपडे चिखलाने माखवीत असते़. विश्रामगृहालगतच्या भागात वाहनांची पार्कीग व्यवस्थेची जागा वगळता ईतर ठिकाणी प्रवासी लघुशंकेसाठी वापर करीत आहेत. याच भागात घाणपाणीही मोठ्या प्रमाणात साचले आहे. डुकरांच्या धुडगुसाबाबत तर न बोललेच बरे़.महिला प्रवाशांची कुचंबनाबसस्थानकाच्या मुत्रीघरात स्वच्छतेचा अभाव आहे़ नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे येथे दुर्गधीच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ परिणामी पुरूष प्रवाशी मुत्रीघरांऐवजी उघड्यावर लघुशंका करतात़ पुरूषांचीच अशी अवस्था आहे़ तर महिलांना किती त्रास सोसावा लागत असेल हे त्यांनाच ठाऊक यामुळे महिला प्रवाश्याची कमालीची कुचंबना होते़ फ लाटाचीच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे़ फ लाटांची स्वच्छता होत नसल्यामुळे तेथे कचºयाचे ढिग पडलेले असतात़चालकांच्या मनमानीने कळस गाठला आहे़ चालक मनाला वाटेल तेथे गाड्या लावतात़ गाड्यांच्या फ लकांची त्यांनी अॅलर्जीच आहे़ त्यामुळे प्रवाश्यांना गाडी कधी लागली अन् कधी गेली हे कळत नाही़.
वराह, श्वानांचा धुडगुस नित्याचाचबसस्थानकात आजमितीला डुकरांनी, कुत्र्यांनी धुडगूस चालविला आहे़ प्रवाशांच्या सामानाचे लचके तोडणे, लहान मुले, महिलांच्या अंगावर धावून जाणे असे प्रताप या प्राण्यांपासून सर्रास सुरू असतात़ आज(दि़१४ ) या डुकरांनी कहरच केला़ तालुक्यातील एक दाम्पत्य बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते़ त्यांच्या हातातील पिशवी त्यांनी प्रवासी फलटावर ठेवली ़ पिशवीत काही खाण्या-पिण्याच्या सामानासह कपडे ठेवलेले होते़ डुकराने त्यांच्या पिशवीवरच डल्ला मारला व संपूर्ण पिशवी घाण करुन ठेवली. पिशवीतील खाण्याचे पदार्थ फ स्त केले़ तर कपडेही घाण केले. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
सद्यस्थितीत सफाई कामगारांचा ठेका संपला असून यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे. तरी सुध्दा आगाराकडून तात्पुरते नियोजन म्हणून काही सफाई कामगाराकडे स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे. दिवसातून तीन वेळा ते आगाराची स्वच्छता करीत आहेत. तरी याकडे लक्ष देतोय.-विनोद इलामेआगार व्यवस्थापक , वाशिम